Three people of Wani killed in Chandavadanagika accident | नाशिकजवळ बस-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
नाशिकजवळ बस-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार

चांदवड : येथील रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात वणी येथील एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार झाले.

वणी येथील सप्तशृंग पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया व मुलगा हिमांशु समदडीया अशी मृतांची नावे आहेत. धुळे येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास ते गेले होते. विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत असताना हा अपघात झाला. फोर्ड फिगो या कारमधुन ते परतीचा प्रवास करत होते. एस टी बस व कारच्या अपघातात बळी गेलेल्या समदडीया कुटुंबियांच्या आप्तेष्टांना जबर धक्का बसला असून वणी शहरातुन शेकडो आप्तेष्ट घटनास्थळी पोहचले.

या घटनेमुळे वणी शहरावर शोककळा पसरली आहे. संजय समदडीया यांचे समवेत प्रवास करणारा दुसरा मुलगा जखमी असुन चांदवडच्या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


Web Title: Three people of Wani killed in Chandavadanagika accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.