शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला पाठवणार ट्रकभर पुरणपोळ्या

By admin | Updated: March 26, 2017 23:58 IST

अमळनेर : मंगळग्रह मंदिरात पुरणपोळ्या आणून देण्याचे आवाहन

अमळनेर : आळंदी (देवाची) येथील स्वानंद सुकनिवासी जोग महाराज संस्थापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभरापासून अखंड हरिनाम संकीर्तन सुरू आहे. त्याची सांगता 29 मार्च रोजी होणार आहे. यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असून, त्या सर्वाना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला जाणार आहे.यासाठी राज्यभरातून पुरणपोळ्या गोळा करून तेथे पाठविल्या जाणार आहेत. अमळनेरातूनही जवळपास एक ट्रकभर पुरणपोळ्या पाठविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी शक्य होतील तितक्या पुरणपोळ्या गुढीपाडव्याला 28 रोजी दुपारी 1 वाजेर्पयत श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आणून द्याव्यात, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.दरम्यान, जमा केलेल्या सर्व पुरणपोळ्या सुरक्षित रहाव्यात यासाठी त्यांना विशेष प्रकारे आवरण लावण्यात येणार आहे.जमा झालेल्या पुरणपोळ्या घेऊन मिनीट्रक आळंदी (देवाची)कडे रवाना होईल. रात्री हा ट्रक आळंदीला पोहचेल.धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाचा सिंहाचा वाटा आहे. आळंदी (देवाची) येथे होत असलेल्या त्यांच्या कार्यक्रमात खारीचा वाटा उचलण्याचा श्री मंगळग्रह मंदिराचा प्रय} आहे.  भाविकांनी जास्तीत जास्त पुरणपोळ्या जमा कराव्यात.                      -डिगंबर महाले,अध्यक्ष, श्री मंगळ सेवा संस्थान.