शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आजची शिक्षण पध्दती पुस्तकी शिक्षण व गुणांवर भर देणारी, तिला व्यवहारिक पातळीवर नेण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 17:05 IST

अंजिक्य कोत्तावार : विद्यार्थ्यांच्या समस्यांचे केले निरसन

जळगाव - आजची शिक्षण पद्धती पुस्तकी शिक्षण व मार्कांवर अधिक भर देणारी असून त्याला व्यावहारिक पातळीवर नेण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक गोष्टीतून शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यास शिक्षणाचा उद्देश सध्या होईल असे प्रतिपादन युवा संशोधक व सर्वात जास्त पेटंट नावावर असलेल्या अजिंक्य कोत्तावार यांनी केले.रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गप्पा इंडियाशी हा कार्यक्रम बुधवारी रोटरी भवनात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ याप्रसंगी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे, सचिव सुनील सुखवाणी, कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी व प्रशांत महाशब्दे उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला चालना द्याआपल्या मनोगतात कोत्तावार पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला चालना दिली पाहिजे त्यासाठी पालकांनी पाल्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली पाहिजे व त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. दैनंदिन जीवनातील समस्यांना उत्तर शोधण्याचे काम प्रत्येक माणूस करीत असतो. यातून एका नाविन्यपूर्ण आविष्काराची तो अनुभूती घेतो. त्यांना सापडलेले उत्तर सामन्यांना उपयुक्त ठरावे, ते व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्षात साकारावे यासाठी उद्योजकीय गुणांद्वारे उद्योग क्षेत्राची निर्मिती होते. यातूनच अनेकांना चांगले रोजगार उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारेच आपण बेरोजगारीच्या समस्येला उत्तर शोधू शकतो असे ते म्हणाले. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांची व आवडीच्या क्षेत्राची ओळख झाली पाहिजे व तीच यशस्वी करिअरची पायाभरणी असते असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत महाशब्दे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबच्या मायादेवी नगरातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव