शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्केच कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:47 IST

३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून आदेश लागू

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. याची अंमलबजावणी २० मार्चपासून होणार असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच अधिकारी व कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात शासकीय कार्यालयांचे तातडीचे व महत्त्वाचे काम सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता त्यांना आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे, अशा सूचना केल्या आहेत.यात अधिकारी व कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेमध्ये लवचिकतेची सवलत देण्यासंदर्भातसुद्धा विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करण्याचा निर्णय घ्यावा, यात अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, प्रमुखांना उपलब्ध करून द्यावा तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मिळताच उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असेही आदेशात म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव