टिकटॉक व्हिडिओ बेतला जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:35 PM2019-08-19T14:35:24+5:302019-08-19T14:36:06+5:30

तरूणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू : जिवंत असल्याच्या आशेवर रुग्णालयात फिरफिर

Ticketock video Beth is dead | टिकटॉक व्हिडिओ बेतला जिवावर

टिकटॉक व्हिडिओ बेतला जिवावर

Next

जळगाव : मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सुप्रिम कॉलनीतील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्र्देवी घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली़ पांडुरंग मारूती अठारे (२६) असे मृत तरूणाचे नाव आहे़ टिकटॉक व्हिडिओ बनविण्याच्या नादात त्याचा पाण्यात पाय घसरला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. दरम्यान, तो जिवंत आहे या आशेवर नातेवाईकांनी तीन खासगी रूग्णालयात फिरविले. फिरून नंतर मृतदेह घरी नेण्यात आला. रात्री पावणे आठ वाजता पोलिसांना पुन्हा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला़
पांडुरंग अठारे हा तरूण कुटुंबियांसह सुप्रिम कॉलनीत गेल्या तीन ते चार वर्षांपासून वास्तव्यास होता़ तो मालवाहू वाहनावर चालक होता़ रविवारी त्याचे मेव्हणे व त्यांचे भाऊ तसेच दोन ते तीन जण मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला होता़ मेव्हण्यांना पोहता येत असल्याने ते दूर निघून गेले होते़ इकडे टिक- टॉक व्हिडिओ बनवित असताना अचानक त्याचा पाय घसरला व त्याच्या नाका तोंडात पाणी गेले बाकीच्या मित्रांनी आरडा- ओरड केली़ नंंतर त्याला बाहेर काढण्यात आले़
दरम्यान, तो दोन वेळेस पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता मात्र तिसऱ्या वेळेत उतरल्यानंतर खड्ड्यात अडकल्याने तो बुडाल्याचेही सांगण्यात आले़ त्याचे मेव्हणे जवळ पोहत असते तर कदाचित त्याला लवकर बाहेर काढता आले असते, असेही काहींनी सांगितले़ त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ किरण, बहीण अर्चना असा परिवार आहे़ किरण याचे चहाचे दुकान आहे.
पाण्यातून बाहेर काढल्याचाही व्हिडिओ व्हायरल
पांडुरंग याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतरचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ शिवाय पांडुरंग याला उचलून नेत असल्याचेही यात दिसत आहे़
सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
मेहरूण तलावात रोज युवकांचा काहीना काही कारणास्तव बुडून मृत्यू होत असून या ठिकाणी त्वरित जीवरक्षक व सुरक्षा रक्षक नेमावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्ध प्रमुख सलिम इनामदार यांनी केली आहे़ याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून राष्ट्रवादीतर्फे मागणी मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे़ महापालिकेने सुरक्षा व्यवस्था केल्याास तरूणांचे प्राण वाचतील असे त्यांनी म्हटले आहे़

मृतदेह घरी आणून पुन्हा रूग्णालयात हलविला
पांडुरंग याला बाहेर काढल्यानंतर मित्रांनी त्याला जिल्हा रूग्णालयात हलविले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर श्वासोच्छवास सुरू असल्याचे लक्षात आले. तिथून त्याला तत्काळ खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. पुन्हा त्याला दुसºया रूग्णालयात हलविले मात्र त्या ठिकाणीही मृत घोषित केल्यानंतर मृतदेह घरी नेण्यात आला़ पोटावर हात पडल्याने त्याला उलटी झाल्यानंतर तो जिवंत असल्याचा समज झाला आणि नातेवाईकांनी पुन्हा खासगी रूग्णालय गाठले़ मात्र डॉक्टरांनी वाहनातच तपासणी करून मृत घोषित केले़ त्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला़

दोन दिवसात तीन मृत्यू
मेहरूण तलावात यंदा पाण्याची पातळी वाढली आहे़ या तलावात अनेक ठिकाणी न समजणारे जीवघेणे खड्डे आहेत़ याच तलावात दोन भावांचा मृत्यू झाला होता़ या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच एका तरूणाचा मृत्यू झाला़

शनिवारीच केली नवी मालवाहू गाडी बूक
पांडुरंगकडे एक मालवाहू व एक चारचाकी गाडी होती़ त्याने शनिवारीच एक मालवाहू गाडी बुक केली होती़ ती गाडी गणेशोत्सवात घरी आणण्याचे त्याचे प्रयोजन होते़

पोलिसांची समजूत...
पांडुरंगचा मृतदेह थेट घरी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सतीश गर्जे, अतुल पाटील यांनी पांडुरंगच्या घरी जात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नकार दिला, घरून मृतदेह घेऊन जाऊ नका, असे नातेवाईकांचे म्हणणे होते, मात्र, पोलिसांनी नातेवाईकांनी समजूत घालत अखेर मालवाहू गाडीत रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला़ तलावाच्या काठावर बसून तो व्हीडीओ तयार करीत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

Web Title: Ticketock video Beth is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.