शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:07 IST

शेतकरी चिंतातूर

सातगाव डोंगरी, जि. जळगाव : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरासह तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे.खान्देशातील नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशी पिकाची लागवड करत असतो. मागील वर्षी ज्यांच्या विहिरींना थोडंफार पाणी होतं. अशा शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कपाशीची लागवड केली होती. मात्र भर दिवाळीतही अवकाळी पावसाने मान्सून पूर्व कपाशी पूर्णपणे सडून गेली. पावसाळ्याचे जवळपास पूर्ण दिवस पाऊस पडत राहिल्याने, कपाशी पिकाची उंची वाढत गेली आणि उंची मुळे शेतकऱ्यांच्या चेहºयावर आनंद द्विगुणित होत गेला. मात्र अतिपावसाने कपाशीला फुलांचा बरच आला नाही. त्यामुळे काही वीस- पंचवीस टक्केच बोंडे पक्के होण्याचा प्रसंग कपाशी पिकावर अर्थात बळीराजाला आला. यामध्ये तर सातगाव डोंगरी, पिंप्री, सारवे, वाडी, शेवाळे, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, लोहारी, वरखेडी, पिंपळगाव हरे. वडगाव कडे, वरसाडे, आदी गावे अजिंठा पर्वताच्या जवळच असल्याने जमिनी हलक्या स्वरूपाची असल्याने सदर जमिनी मध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने कपाशी पिके अकाली लाल पडली. त्यामुळे २० टक्के सुद्धा कपाशीचे उत्पादन येईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.अनेक शेतकरी कपाशीचा दुसरा बहार घेण्याच्या तयारीत असतात. मात्र त्यासाठी कपाशीचे झाड हे हिरवे असणे आवश्यक असते. तरच दुसरा बहारा घेता येतो. आता तर कपाशी पूर्णपणे लाल पडल्याने झाडाला दुसरा बहार फरदड म्हणून घेता येणार अशक्य वाटत आहे. त्यामुळे कपाशीचे पीक उपटून टाकल्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव