वीर जवानाच्या अंत्ययात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:46 IST2021-02-02T21:46:19+5:302021-02-02T21:46:57+5:30
गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी तब्बल ११ जणांचे खिसे कापून सुमारे ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

वीर जवानाच्या अंत्ययात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : वीर जवान सागर धनगर यांना अखेरचा निरोप दिला जात असताना जमलेल्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी तब्बल ११ जणांचे खिसे कापून मोबाईल हँडसेटसह रोख रक्कम असा सुमारे ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तलोंदे प्र. दे येथील सुनिल आनंदा साबळे यांच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड व सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्याचवेळी चोरट्यांनी शाम जगताप, शरद जाधव, शिवाजी साबळे, पांडुरंग सपकाळे, दिपक पाटील, आदिनाथ बछे, रामेश्वर धनगर, रावसाहेब महाजन, किरण साबळे, रवींद्र कुमावत या अकराजणांच्या खिशातून ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. अंत्ययात्रेत चोरट्यांनी आपल्या माणुसकी हिनतेचे दर्शन घडविल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.