एकाच कुटुंबातील तीन महिला ठार

By Admin | Updated: January 30, 2015 14:56 IST2015-01-30T14:56:07+5:302015-01-30T14:56:07+5:30

कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तीन पादचारी महिला जागीच ठार झाल्याची घटना उधना (सुरत) येथे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.

Three women killed in a single family | एकाच कुटुंबातील तीन महिला ठार

एकाच कुटुंबातील तीन महिला ठार

अमळनेर :  कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तीन पादचारी महिला जागीच ठार झाल्याची घटना उधना (सुरत) येथे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.

मंगलबाई संभाजी पाटील (रा.पैलाड, अमळनेर) त्यांची बहीण शोभाबाई बाबूराव पाटील (रा.लोण ता.भडगाव) व जेठाणी कमलबाई आत्माराम पाटील (रा.पैलाड) अशी मयतांची नावे आहेत. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या नातेवाइकांकडे जात असताना हा अपघात झाला. मंगलबाई व शोभाबाई या दोन्ही बहिणी विधवा, तर मंगलबाईला दोन मुले, दोन मुली आणि शोभाबाईला मुलगा, तीन मुली आहेत. कमलबाईच्या पश्‍चात पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेने पैलाड भाग सुन्न झाला. २९ रोजी घाईघाईत लग्न आटोपण्यात आले. रात्री उशिरा दोघींवर अमळनेरात तर एकीवर लोणमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Three women killed in a single family