शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायासाठी पर्यायी जागेवरून हॉकर्सचा तीन तास गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसायासाठी जुन्या साने गुुरुजी रुग्णालयाच्या जागेचा पर्याय सांगितल्यामुळे, हॉकर्स बांधवांनी या जागेला विरोध ...

जळगाव : फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसायासाठी जुन्या साने गुुरुजी रुग्णालयाच्या जागेचा पर्याय सांगितल्यामुळे, हॉकर्स बांधवांनी या जागेला विरोध करून व्यावसायाला अनुकूल असलेल्या जागेच्या मागणीसाठी सोमवारी मनपात तीन तास गदारोळ घातला. सुमारे ३०० ते ४०० हॉकर्स एकाच वेळी मनपात धडकल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आयुक्तांनी हॉकर्स बांधवांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीत या पुढे फुले मार्केटमध्ये व्यवसायाला बसू दिले जाणार नसून, अन्यथा प्रशासनातर्फे हॉकर्सवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्समुळे रहदारीला अडथळा व काही गाळेधारक व्यावसायिकांकडून हॉकर्समुळे त्यांच्या व्यवसायावर होत असलेल्या परिणामाबाबत तक्रारी करण्यात येत असल्यामुळे मनपातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तसेच काही महिन्यांपासून या ठिकाणी चोरीचेदेखील प्रकार वाढले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने येथील हॉकर्स बांधवांना पर्यायी जागेवर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हॉकर्स स्थलांतरीत होत नसतील, तर गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही मनपा प्रशासनाने घेतल्याने, या निर्णया विरोधात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता फुले मार्केटमधील सर्व हॉकर्स मनपात येऊन प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनपा आवारात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, हॉकर्स बांधवांनी यावेळी महापौर भारती सोनवणे नगरसेवक कैलास सोनवणे यांची भेट घेऊन, फुले मार्केटमध्येच व्यवसाय करू देण्याची मागणी केली. यावर महापौरांनी प्रशासन योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

इन्फो :

तासाभराच्या चर्चेनंतरही प्रशासन स्थलांतराच्या निर्णयावर ठाम

आपल्या मागणीसाठी मनपात दाखल झालेल्या हॉकर्स बांधवांशी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह महापौरांनी तासभर चर्चा केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे व उपायुक्त संतोष सोनवणे उपस्थित होते. तर हॉकर्स बांधवांकडून अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सचिन जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हॉकर्स बांधवानी जुन्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेचा पर्याय फेटाळून फुले मार्केटमध्येच बसू देण्याची मागणी लावून धरली. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता तेथे कुठल्याही परिस्थितीत व्यवसाय करण्याची परवानगी देणार नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर जुन्या नपाची जागा ही सध्या वाहन पार्किंगसाठी दिल्याने या ठिकाणींही जागा मिळणे शक्य नसल्याचे सांगत, साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर किंवा हॉकर्स बांधवांनीच नवीन इतर जागा सुचविण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच यावेळी पुन्हा फुले मार्केटमध्ये व्यवसाय थाटल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला.

इन्फो :

सद्या फुले मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट चोरी आदी गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील फुटपाथवर बसणाऱ्या हॉकर्स बांधवांना मनपाने सुचविलेल्या जागांवर स्थलांतरित होऊन व्यवयाय करण्याचे सांगितले आहे. यापूर्वीही सूचना देऊन हॉकर्स बांधव फुले मार्केटमध्येच व्यवसाय करण्यावर ठाम असल्यामुळे, प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.

संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा

इन्फो :

गेल्या २० वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असून, प्रशासनाने आम्हाला या जागेवरच व्यावसाय करू देण्याची आमची मागणी आहे. जुन्या नपाची जागा देण्याची मागणी करत आहोत. परंतु, प्रशासन साने गुरुजी रुग्णालयाची जागा देत असल्यामुळे, आमचा व्यावसाय होणार नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून, गुन्हे दाखल दाखल करण्याचे सांगून, प्रशासन हॉकर्सवर अन्याय करत आहे.

नंदू पाटील, अध्यक्ष, फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियन