शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’शंभर कोटींमधून अद्याप एक ‘दमडी’च्याही कामाला सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:43 IST

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. ...

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. वर्षभरात शहराचा चेहरा- मोहरा बदलविणाच्या दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून अद्याप शासनाने दिलेल्या निधीचेही नियोजन करता आलेले नाही. दोन महिन्यांपुर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटींच्या कामांचीही निविदा अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.१६ आॅगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोथ्थान अंतर्गत शहरासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिनाभरातच शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी आणल्यामुळे मनपातील सत्ताधाºयांनी आश्वासन पाडल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, १०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यावर देखील शहरातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या आजही कायम आहेत. या निधीतून रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, काम सुरु न झाल्याने सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत.दरम्यान, याबाबत महापालिकेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकाºयांचा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ही बैठक होवू शकली नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली. स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी देखील याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना निविदा प्रक्रियेबाबत माहिती विचारली होती. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी नगरोथ्थानमधील कामांची छाननी प्रक्रिया सुरु असल्याने निविदा प्रक्रिया थांबली होती. मात्र, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले असल्याची माहिती स्थायी समिती सभापतींनी दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे काम-नगरोथ्थान मधून १०० कोटी पैकी ४२ कोटी रुपयांचा निधीतून होणाºया कामांना ८ आॅगस्ट रोजी शासनाकडून मंजूरी मिळाली होती. तसेच शासनाने या कामे मनपाकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचाही सूचना दिल्या होत्या.- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील तीन महिन्यात साधी निविदा प्रक्रिया देखील राबवता आलेली नाही. त्यात २१ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काम थांबले असावे मात्र, पूर्ण आॅगस्ट महिना व त्यानंतर आता नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यावर देखील निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली नाही. त्यामुळे कामे रखडली आहे.अजून चार महिने तरी खड्डयांपासून सुटका नाही ?-४२ कोटी रुपयांच्या निधीतून काही यापैकी ४२ कोटी रुपयांमधून १३० कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यात १६ कोटी रुपयांमधून शिवाजी नगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशनपर्यंतचा रस्ता, कालींका माता मंदिर ते जुना खेडी रस्त्यापर्यंतचा २४ मीटरच रुंद रस्ता तयार करण्यासह दुभाजक तयार करण्यात येणार आहे.-रायसोनीनगर जकातनाका ते मनपा हद्दीपर्यंतचा १८ मीटरच्या डीपीरोडचे डांबरीकरण, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक ते वाघ नगर, जि.प.चौक ते नेरीनाका स्मशानभूमीपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे शहरातील काही भागातील नागरिकांना खड्डयांपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, अद्याप या कामांसाठी निविदा देखील काढण्यात आली नसल्याने या कामांना केव्हा सुरुवात होईल आणि केव्हा रस्त्यांचे भाग्य उजाडणार ? याचा प्रतीक्षेत सामान्य जळगावकर आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव