शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

चोर ... चोर आरडा-ओरड करताचं टॉमी सोडून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:29 IST

जळगाव - शहरातील नवीपेठमधील जे़एम़वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल या दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे दोन चोरट्यांच्याकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची ...

जळगाव- शहरातील नवीपेठमधील जे़एम़वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल या दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे दोन चोरट्यांच्याकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे़ दरम्यान, कुलूप तोडण्याचा आवाज आल्यानंतर रस्त्यावरील जात असलेल्या गुरखा धन बहादूर याने सतर्कता दाखवित त्वरित चोऱ़़चोर आरडा-ओरड केली़ गुराख्याला पाहून चोरट्यांनी जागेवरचं टॉमी सोडून धूम ठोकली़ त्यामुळे चोरट्यांचा मोठा चोरीचा प्रयत्न फसला़ गुरख्याने दाखविलेल्या सतर्कतमुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत होते़पोलन पेठ येथील रहिवासी माजी नगरसेवक जितेंद्र रामकिशन मुंदडा यांचे नवीपेठेत जे़एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ तर शेजारीचं त्यांचे शालक आनंद मंडोरा यांचे उद्धव डिजीटल नावाचे दुकान आहे़ जितेंद्र मुंदडा हे व त्यांचा मुलगा निखिल हे दुकान सांभाळतात़ रोज सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर रात्री ९ वाजता निखिल हा दुकान बंद करून घरी जातो़ गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून निखिल आणि सर्व कार्मचारी घरी निघून गेले़चोरट्यांनी तोडले कूलूपशुक्रवारी पहाटे ३़३० वाजेच्या सुमारास मालवाहतूक व दुचाकीवरून आलेले दोन चोरट्यांनी आधी माजीनगरसेवक जितेंद्र मुंदडा यांच्या जे़एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला़ दोन्ही कुलूप तोडल्यानंतर शेजारीचं असलेले उद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरूवात केली़कुलूप तोडण्यावा आवाज़़़अन् गुरखाने केली आरडा-ओरडउद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक कुलूप तोडण्याचा आवाज झाला़ नेहमीप्रमाणे गुरखा धन बहादूर हा त्या परिसरात फेरफटका मारत होता़ त्याला कुलूप तोडण्याचा आवाज येताच त्याने त्याठिकाणी धाव घेतली व अन् समोर चोरटे दिसले़ चोर..चोर.. आरडा-ओरडा करीत त्याने चोरट्यांकडे धाव घेतली़ गुरख्याला पाहून चोरट्यांनी जागेवर दोन टॉमी सोडून धूम ठोकली.अंधाराचा फायदा घेत चोरटे पसारगुरख्याने आरडा-ओरड करताचं परिसरातील नागरिकांनाही जाग आली़ त्यातच गुरख्याने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले़ हा संपूर्ण थरार गुरूवारी मध्यरात्री ४़१५ वाजेच्या सुमारास घडला़ परिसरातील नागरिकांनी देखील चोरटे दिसले़ दरम्यान, रिक्षा व पल्सर चोरट्यांजवळ असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले़ तसेच परिसरातील रहिवाश्यांनी जितेंद्र मुंदडा यांना फोन करून घटनेची माहिती दिली़ व त्यांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली़ यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडलेले आढळून आले़ तसेच एक कूलूप चोरट्यांनी सोबत नेल्याचेही आढळून आले़ पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात माहिती कळविली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ व सीसीटीव्ही फुटेज तपासले़ दरम्यान, गुराखाने दाखविलेल्या हिंमतीमुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला़ सुमारे दुकानांमध्ये वीस ते पंचवीस लाखांचा माल होता़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव