तेजी समाज युवक मंडळाची सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST2021-07-12T04:11:38+5:302021-07-12T04:11:38+5:30

जळगाव : श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाची सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी ...

Teji Samaj Yuvak Mandal meeting in excitement | तेजी समाज युवक मंडळाची सभा उत्साहात

तेजी समाज युवक मंडळाची सभा उत्साहात

जळगाव : श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाची सभा नुकतीच उत्साहात पार पडली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ठरावांमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये वधू-वर पालक परिचय मिळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच स्वर्ग रथ तयार करण्याचा मानस करण्यात आला़ शेवटी संस्थेचा आजपर्यंतचा आर्थिक ताळेबंद मांडण्यात आला. यावेळी सभेमध्ये नंदू चौधरी, सीताराम देवरे, संतोष चौधरी, रवींद्र चौधरी, बी.एम.चौधरी, डी.ओ.चौधरी, प्रभाकर महाले, दशरथ चौधरी, अनिल पाटील, प्रशांत सुरळकर, रामचंद्र चौधरी, विनोद चौधरी, भगवान चौधरी, किरण चौधरी, मधुकर देवरे, कमलाकर चौधरी, भिकन चौधरी, सुभाष चौधरी, विशाल पाटील, दीपक चौधरी, दीपक धनराज चौधरी, पी़ सी़ चौधरी, मेघश्याम चौधरी, अनंत चौधरी, संतोष चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार दशरथ चौधरी यांनी मानले.

Web Title: Teji Samaj Yuvak Mandal meeting in excitement