शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महादेवाची शपथ घेत गावविकासाचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : गावाच्या विकासासाठी अडीच-अडीच वर्षे सरपंचपद ठेवत दोन्ही सदस्यांसोबत राहण्याचा भादली येथील ग्रामपंचायत सदस्यांनी संकल्प केला आहे. यासाठी ...

जळगाव : गावाच्या विकासासाठी अडीच-अडीच वर्षे सरपंचपद ठेवत दोन्ही सदस्यांसोबत राहण्याचा भादली येथील ग्रामपंचायत सदस्यांनी संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी थेट महादेवाची शपथ घेत ११ सदस्य साथ सोडणार नसल्याचा निश्चय केला आहे.

तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच भादली बुद्रुक येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी महादेव मंदिरात जाऊन गावविकासासाठी एकजुटीचा संकल्प केला. यामध्ये महादेव पिंडीवर हात ठेवून सुरुवातीचे अडीच वर्षे सर्व जण मिलिंद चौधरी यांच्यासोबत व नंतरचे अडीच वर्षे मनोज चौधरी यांच्यासोबत राहू, अशी शपथ घेतली. विशेष म्हणजे, यावेळी मनोज चौधरी हे उपस्थित नसले तरी हजर असलेल्या ११ सदस्यांनी अडीच वर्षे चौधरी यांच्यासोबतच राहण्याचा संकल्प केला. यावेळी सर्वांनी महादेवाच्या पिंडीवर पाणी सोडले. आम्ही सर्व जण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आलेलो आहोत, यात कोणताही बदल होणार नाही, असेही यावेळी सर्वांनी ठरविले. या संकल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

यावेळी सदस्य अंजली पाटील, विद्या कावळे, अरुण सपकाळे, कीर्ती कोळी, मीराबाई कोळी, संदीप कोळी, परेश रडे, विजया चौधरी, पूजा नारखेडे, मिलिंद चौधरी, शोभा झांबरे हे सदस्य उपस्थित होते.