हिंगोणा येथील तलवार बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:28+5:302021-09-02T04:35:28+5:30

फैजपूर, ता. यावल : हिंगोणा (ता. यावल) येथील एका २२ वर्षीय तरुणास धारदार तलवारीसह मंगळवारी दुपारी ...

Sword bearer arrested in Hingona | हिंगोणा येथील तलवार बाळगणाऱ्यास अटक

हिंगोणा येथील तलवार बाळगणाऱ्यास अटक

फैजपूर, ता. यावल : हिंगोणा (ता. यावल) येथील एका २२ वर्षीय तरुणास धारदार तलवारीसह मंगळवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन अंबादास पाटील असे या तरुणाचे नाव आहे.

हिंगोणा येथील हटकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या तरुणाकडे तलवार असल्याची गुप्त माहिती सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांना मिळाली. त्यावरून हे.कॉ. देवीदास सूरदास, राजेश बऱ्हाटे, गुलबक्षी तडवी, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांच्या पथकाने सापळा रचून तलवार बाळगणारा तरुण सचिन पाटील यास ताब्यात घेतले. त्याने २६ इंच लांब पाते असलेली धारदार तलवार काढून दिली.

याप्रकरणी शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांत आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन पाटील यास अटक करण्यात आली आहे. तपास देवीदास सूरदास करीत आहे.

Web Title: Sword bearer arrested in Hingona