शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाने वाढविली सुवर्णनगरीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:31 IST

सोन्याचा नवा उच्चांक

विजयकुमार सैतवालजळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहचून ते ३७ हजाराच्या पुढे जात चांदीचेही भाव वाढलेले आहे. रुपयामध्ये होत असलेली घसरण सुवर्णनगरी जळगावची चिंता वाढवित आहे.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच त्यात भरात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या सहा वर्षातील एकाच वेळी (एक रुपया १० पैसे) वाढलेले भावही कारणीभूत ठरत आहे. ५ आॅगस्ट रोजी ६९.६५ रुपयांवर असलेले डॉलरचे भाव ६ रोजी ७०.७५ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोन्याचेही भाव थेट ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढले. ३५ हजार ८०० रुपये प्रती तोळा असलेले सोने वरील सर्व कारणांमुळे थेट ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे.त्यानंतर पुन्हा वाढ होऊन हे भाव ३७ हजार ३५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीचे भाव एक हजार रुपये प्रती किलोने वाढून ४२ हजार ५०० रुपयांवर पोहचले.यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व जून महिन्याच्या शेवटी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतरही भाववाढ अशीच सुरू राहून ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते आता ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. सोन्याच्या भावाचा हा उच्चांक असल्यचे म्हटले जात आहे.या पूर्वी सहा वर्षांपूर्वी सोने ३५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर ते खाली आले होते व पुन्हा या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये ते ३५ हजारावर पोहचले होते. आता तर थेट ३७ हजाराचा पल्ला सोन्याने ओलांडला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव