शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित पोलिसाला एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: November 19, 2014 13:53 IST

पोलीस अधिकार्‍यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी पोलीस कर्मचा-याला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जळगाव : खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी घरझडती घेतल्याच्या रागातून पोलीस अधिकार्‍यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्या.संजय कुलकर्णी यांनी निलंबित पोलीस कर्मचारी सोपान भिका पाटील (वय-४0, रा.जळगाव) याला एक वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.निलंबित पोलीस कर्मचारी सोपान भिका पाटील व हंसराज पद्मसिंग हजारी (दोघे रा.जळगाव) यांच्यावर काही वर्षांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक राजू तळेकर व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरि मोरे यांच्याकडे होता. दोघा अधिकार्‍यांनी घरझडती घेतल्याचा राग आल्याने दोघा आरोपींनी त्यांना त्रास व्हावा यासाठी अँड.सतीश तायडे या उच्च न्यायालयात अस्तित्वात नसलेल्या वकिलांच्या नावाने बनावट नोटीस तयार केली होती. ही नोटीस दोघांनी १२ आमदारांना पाठवून त्यात बदनामीकारक मजकूर टाकला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक राजू तळेकर यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचे कामकाज न्या.संजय कुलकर्णी यांच्या कोर्टात चालले. सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी ११ साक्षीदार तपासले. सोपान पाटील याच्यावर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने कलम ४६५ नुसार एक वर्ष शिक्षा व दोन हजारांचा दंड, कलम ४७१ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच कलम ५00 प्रमाणे सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी हंसराज हजारी याला सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले आहे. सरकारतर्फे अँड.अनिल बागले यांनी तर आरोपीतर्फे अँड.य™ोश पाटील यांनी काम पाहिले.