शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यवंशी, पवार व तायडे यांची मुंबईत सीबीआयकडून कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:54 IST

इन कॅमेरा जबाब : तिघांचा मुंबापुरीत दोन दिवसांपासून मुक्काम, नोटाबदलीसाठी वापरलेली चारचाकी जि.प.तील अधिकाºयाची?

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतील नोटाबदलीच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या  सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी, बांधकाम विभागातील शाखा अभियंता नंदकुमार पवार व बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची शुक्रवारी मुंबई येथे केंद्रीय अन्वेषण  विभागाच्या (सीबीआय) पथकाने कसून चौकशी केली. तिघांचे जबाव नोंदविण्यात आले. काही मुद्द्यांवर इन कॅमेरा जबाबही घेण्यात आल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  दरम्यान, या तिघांनी  काय जबाब दिले, याबाबत माहिती  कळू शकली नाही. नोटा घेऊन जाणारी चारचाकी जि.प.तील व्यक्तीचीनोटाबदलण्यासाठी चोपडा येथे जाताना जी चारचाकी वापरली ती जि.प.तीलच एका व्यक्तीची आहे. ती मात्र कुणाची आहे, हे अजून स्पष्ट झालेले नसल्याची माहिती मिळाली.तिघे गुरुवारीच मुंबईत दाखलसीबीआयच्या पथकाने १० व ११ मार्च अशी सलग दोन दिवस पवार, सूर्यवंशी व तायडे यांची शहरात येऊन कसून चौकशी केली होती. या चौकशीसाठी पथक ९ मार्च रोजीच शहरात दाखल झाले होते. म्हणजेच तीन दिवस सीबीआय पथक त्या वेळेस मुक्कामी होते. बीएसएनएलच्या निरीक्षण गृहात (आयक्यू) पथकाने कॅम्प आॅफीस जणू तयार केले होते. १० रोजी जि.प.मध्ये व पवार व सूर्यवंशी हे बसतात त्या ठिकाणांवर जाऊन त्यांची झाडाझडती घेतली. तसेच पवार यांच्या घरीही चौकशी झाली होती. नंतर सूर्यवंशी व तायडे यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. यानंतर १६ व १७ मार्च रोजी जि.प.तील या तिन्ही अधिकारी व कर्मचाºयांना चौकशीसाठी मुंबईत सीबीआयने बोलावले होते. तिघे चौकशीनंतर शुक्रवारीही शहरात दाखल झालेले नव्हते. आणखी किती दिवस चौकशी सुरू राहील याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. जळगाव जिल्हा बँकेतील नोटाबदलीप्रकरणात मुंबईत तिघांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने यासंबंधी संबंधितांकडून विविध मुद्द्यांवर माहिती घेतली जात आहे.-आर.के.गौर, प्रवक्ता, सीबीआय, मुंबईसूर्यवंशी यांचा ग.स.संचालकपदाचा राजीनामा मंजूरजिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे (ग.स.) माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी यांचा ग.स.च्या संचालकपदाचा राजीनामा शुक्रवारी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूर्यवंशी यांचा राजीनामा १५ मार्च रोजी सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांच्याकडे प्राप्त झाला होता. हा राजीनामा बी.बी. पाटील यांनी कार्यकारी मंडळाकडे सादर केला. अखेर हा राजीनामा मंजूर होऊन त्याबाबतची नोंद इतिवृत्तामध्ये झाली आहे. सूर्यवंशी यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र १७ रोजी दुपारी त्यांच्या रिंगरोडनजीकच्या हर्ष रेसिडेन्सीमधील निवासस्थानी पत्राद्वारे देण्यात आले. तसेच राजीनाम्याची प्रत व इतर माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्येही देण्यात आल्याचीही माहिती मिळाली.