जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या सर्व्हेक्षणाला अद्यापही मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:20 PM2020-02-19T12:20:04+5:302020-02-19T12:20:51+5:30

३१ जानेवारीची अहवालाची मुदतही संपली

The survey of Anganwadis in Jalgaon district is not yet available | जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या सर्व्हेक्षणाला अद्यापही मुहूर्त मिळेना

जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या सर्व्हेक्षणाला अद्यापही मुहूर्त मिळेना

Next

जळगाव : जिल्ह्यातील ५५ अंगणवाड्यांचे सर्व्हेक्षण करून विद्यार्थी उपस्थितीसंदर्भात ३१ जानेवारीपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश असतानाही जि़ प़ कडून अद्याप एकाही अंगणवाडीचे सर्व्हेक्षण झालेले नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे या सर्व्हेक्षणाला मुहूर्त मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे़
एकात्मिक बाल सेवा योजनेअंतर्गत अंगवाडी केंद्र कार्यरत असून शून्य ते ६ वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतात़ या उप्रकमांचे रिअल टाईम मॉनिटरींग करण्यात येत असून कॉमन अ‍ॅप्लीकेश सॉफ्टवेअर द्वारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योनजेचे सनियंत्रण करण्यात येत आहे़ अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने हे सर्व्हेक्षण होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे़ ज्या अंगणवाड्यांमध्ये शून्य पटसंख्या दाखविली जाते ती मोबाईलची तांत्रिक अडचण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़
नोव्हेंबर २०१९ मध्ये सीएएस अहवालानुसार ३ ते ६ वयोगाटील बालके अगदी कमी प्रमाणात अंगणवाड्यांमध्ये येत असल्याचे समोर आले होते. अशा ५५ अंगणवाड्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून करण्यात आल्या होत्या़ अहवालाची अंतिम तारीख उलटून १५ दिवस होऊनही सर्व्हेक्षण सुरू झालेले नाही़

Web Title: The survey of Anganwadis in Jalgaon district is not yet available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव