शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी पिके, पिण्यासाठी पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या ...

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. तापी नदीवर मुख्यत्वे उकाई धरण, काकरापार धरण व हतनूर धरण बांधण्यात आलेले आहे. त्यापैकी हतनूर धरणातून तापी नदीत हक्काचे व हिश्श्याचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी चोपडा तालुकावासीयांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टी. बाविस्कर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

नदी अखंड वाहत राहावी

तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे, अशीही मागणी याआधीच झालेली आहे. कारण पावसाळा संपला की तापीत पाण्याचा प्रवाह खंडित होऊन नदीचे पात्र कोरडेठाक होत असते. धरणाच्या वरील भागात मुबलक पाणी असल्याने तो भाग सुजलाम् सुफलाम् होतो. धरणाखालील भागात पाणी वाहत नसल्याने टंचाई निर्माण होत असते. यासाठी तालुकाभरातून ह्या मागणीला शेकडो लोकांनी दुजोरा दिलेला आहे.

----

विहिरींची पाणी पातळी खोल

यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खूपच खोल गेलेली आहे. त्यामुळे सध्या शेतात असलेली केळी, ऊस, पपई व इतर भाजीपाला पिकांना पाणी कमी पडत आहे. तसेच पुढील काळात कापूस व इतर पिके लागवड करतानासुद्धा पाण्याची गरज भासणार आहे. म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन सोडणे गरजेचे आहे. अशा आशयाचे निवेदन राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, पाणीपुरवठा व पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी, चोपड्याचे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर तालुकावासीयांतर्फे चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक), आदर्श घुमावल बु.चे सरपंच वसंतराव पाटील, चोपडा राष्ट्रवादीचे माजी तालुका युवा अध्यक्ष दीपक सोनवणे (हातेड खुर्द), सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर, वैभवराज बाविस्कर (चोपडा) यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - २७सीडीजे १