स्टेटसवर स्वत:ला श्रध्दांजली वाहत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 10:42 PM2021-02-17T22:42:32+5:302021-02-17T22:43:10+5:30

लेलेनगरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली.

Suicide of a youth paying homage to himself on status | स्टेटसवर स्वत:ला श्रध्दांजली वाहत युवकाची आत्महत्या

स्टेटसवर स्वत:ला श्रध्दांजली वाहत युवकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : पहूर येथील लेलेनगरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. आकाश रवींद्र बाविस्कर(२२)  युवकाचे नाव असून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहून त्याने ही आत्महत्या केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश बाविस्कर याने राहत्या घरात गळफास लावून घेतल्याचे बुधवारी संध्याकाळी उघडकीस आले. दोन युवकांनी  उपसरपंच राजू रामदास जाधव यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालविली होती.  यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात गर्दी जमा झाली होती.

पहूर रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार  होणार आहेत. त्याच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

व्हाॅटस्ॲपवर स्टेटस 
घटना घडण्यापूर्वी आकाशने व्हाॅटस्ॲप स्टेटस वर स्वत:चा फोटो लावला व त्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार पोलिसांच्या समोर आला आहे. घटना घडल्या नंतर त्याच्या मित्र परीवाराने पोलीसांना स्टेटस दाखविले आहे. त्याची घरची परीस्थिती हालाखीची असल्याचे सांगितले जात आहे.  आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनू बाविस्कर यांचा तो चुलत भाऊ आहे.
 

Web Title: Suicide of a youth paying homage to himself on status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.