शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तासं-तास रिडींगला न बसता बागेतच बनविली अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 9:38 PM

जळगाव - ग्रंथालयात पुस्तक घेऊन तासं-तास अभ्यास करीत असताना अनेकवेळा विद्यार्थ्यांना कंटाळा येतो़ दरम्यान, रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा कंटाळा ...

जळगाव- ग्रंथालयात पुस्तक घेऊन तासं-तास अभ्यास करीत असताना अनेकवेळा विद्यार्थ्यांना कंटाळा येतो़ दरम्यान, रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा कंटाळा दूर करण्यासाठी चक्क ‘बागेतील अभ्यासिका’ उपक्रमातंर्गत शनिवारी महाविद्यालयाच्या बागेतचं अभ्यासिका बनवून निसर्गरम्य वातावरणात अभ्यास करण्याचा आनंद घेतला.कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठाने विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केल्याने सर्व विध्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहे. घर असो की कॉलेज प्रत्येक विध्यार्थी आपल्या वर्गात शिकवलेल्या बाबीचा अभ्यास करताना दिसत आहे. या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयाकडून बागेतील अभ्यासिका हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची निसर्गरम्य वातावरणात संधी मिळावी, म्हणून हा जिल्ह्यातील पहिला प्रोजेक्ट कॅम्पसमध्ये सुरु करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांकडून परीक्षांची तयारीमहाविद्यालयाच्या आवारात रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी कनिष्ट महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक यासारख्या वेगवेगळ्या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच वस्तीगृहातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी येथे स्टडी क्लब हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. या माध्यमातून महाविद्यालयातील ग्रंथालय मुलांसाठी २४ तास सुरु ठेवण्यात येते. परंतु ग्रंथालयातून पुस्तक घेऊन तासनतास रिडींग रुममध्ये अभ्यास करण्याचा मुलांना कंटाळा येऊ शकतो, हे लक्षात घेऊन बागेतील अभ्यासिका हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमाचे विध्यार्थी एकत्र येत असून त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध पैलूमुळे नवनिर्मिती व इंटरडीसीप्लीनरी येण्यास मदत होत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. भूषण राठी, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गौरव संचेती, डॉ. दीपक शर्मा, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील हे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव