शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीडगन’ने रोखला ४१०५ वाहनांचा वेग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून, वाहतुकीला ...

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाकडून ’इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी करण्यात आल्या आहेत. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर अशी अत्याधुनिक यंत्रणा आहेत. या वाहनाद्वारे वर्षभरात ४१०५ वाहनांचा स्पीड रोखण्यात आला असून ३७ लाख ८ हजाराचा दंड या वाहनधारकांना आकारण्यात आलेला आहे.

‘अति घाई, संकटात नेई’ अशी वाक्ये महामार्गावरील फलकांवर लिहिण्यात आली आहेत. याचा अर्थ असा की वाहनांचा वेग मर्यादेत ठेवणे अपेक्षित आहे. वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात ’इंटरसेप्टर व्हेइकल’ हे वाहन देण्यात आले आहे. या वाहनात साडे बारा लाख रुपये किमतीचा कॅमेरा बसविण्यात आला असून या कॅमेऱ्याद्वारे ५०० मीटर ते १ कि.मी.पर्यंत वाहनाचा वेग व त्याचा क्रमांक सहज घेता येतो, त्याशिवाय तीन कि.मी.पर्यंत वाहनाचा वेग किती आहे हे कॅमेऱ्याद्वारे टिपता येते.

लडाखमध्ये दोन वर्षे सराव

स्पीडगन वाहनाबाबत चार आयपीएस अधिकाऱ्यांनी यूएस पॅटर्ननुसार सलग दोन वर्ष यावर मेहनत घेऊन लडाखमध्ये सराव घेतला, त्यानंतर स्पीडगन वाहन देशभरातील पोलीस दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील महामार्गावर चारचाकी कारला ८०, दुचाकी व ट्रकला ७० चा वेग निश्चित करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर १५० तर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे साठी १२० चा वेग निश्चित करण्यात आला आहे.

धावत्या वाहनांची मोजली जाते गती

‘इंटरसेप्टर व्हेइकल’मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. एखादे भरधाव वाहन गेले व स्पीडगनव्दारे त्याचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कळते. त्यानुसार व्हेईकलमधील कॅमेऱ्याव्दारे ५०० मीटर ते १ कि.मी पर्यंतच्या वाहनाचे छायाचित्र काढले जाते. वाहनाच्या क्रमांकावरुन थेट वाहन मालकाला थेट ई-चालान पाठविले जाते. तीन किलोमीटरपर्यंत असलेल्या वाहनाची गती या स्पीडगनतर्फे मोजली जाते.