सहा वर्षांनंतर न्यायालयाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:38+5:302020-12-03T04:28:38+5:30

वासरे येथील हाणामारीत ११ जण झाले होते जखमी लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यातील वासरे येथे २०१४ मधील ...

Six years after the court | सहा वर्षांनंतर न्यायालयाच्या

सहा वर्षांनंतर न्यायालयाच्या

वासरे येथील हाणामारीत ११ जण झाले होते जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील वासरे येथे २०१४ मधील घटनेबाबत न्यायालयाच्या आदेशाने ४७ जणांवर दंगल व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मारवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

वासरे येथील प्रवीण दयाराम पाटील यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, १२ सप्टेंबर २०१४ मध्ये सकाळी साडेसहा वाजता गुलाब पाटोल, देवीदास पाटील, योगेश पाटील, शंकर पाटील, भालचंद्र पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, हिलाल पाटील, दत्तू पाटील, चंद्रभान पाटील, जिजाबराव पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील , विजय पाटील , संजय पाटील, उमेश पाटील, तुकाराम पाटील, विजय पाटील, देवेंद्र पाटील, शिवाजी पाटील, अतुल पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, अविनाश पाटील, किरण पाटील ,नामदेव पाटील , लीलाधर पाटील , रवींद्र पाटील, विनायक पाटील , रवींद्र विनायक पाटील , शरद किसन पाटील, बापू पाटील, रणजित पाटील, दादाभाऊ पाटील, पंडित पाटील, आत्माराम पाटील, मुकेश पाटील, भीमराव पाटील, किसन पाटील, गोकुळ पाटील, भूषण पाटील, अनिल पाटील, संजय धनराज पाटील, भूषण देवीदास पाटील यांचा जमाव प्रवीण पाटील यांच्या घरावर चालून आला व यांच्यामुळे आपल्याला एक दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले, असे म्हणत प्रवीणला घराबाहेर काढून त्याला मारहाण तसेच इतरांनी घरावर दगड, विटांचा मारा केला. भानगड आवरायला गेलेले मनोहर पाटील, देवीदास पाटील, प्रशांत पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रोहिदास पाटील , दीपक पाटील, रवींद्र पाटील, प्रमोद पाटील यांनादेखील जखमी केले. न्यायालयाने ४७ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून दंगल व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास एपीआय राहुल फुला करीत आहेत.

Web Title: Six years after the court