शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंसह सहा जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

बीडीओंसह सहा जणांवर खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर, (जि. ...

बीडीओंसह सहा जणांवर

खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर, (जि. जळगाव) : मागासवर्गीय महिला सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमळनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे,यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मठगव्हाण येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी याबाबत फिर्याद दिली. त्या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंचपदाचा कारभार पाहत होत्या. त्यावेळी बीडीओंनी वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणीच्या नावाखाली एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ग्रामसेवकपद रिक्त असल्याने त्याबाबत तक्रार केली असता त्यांनी अश्लील व जातिवाचक शब्द वापरले. त्यामुळे वाघ यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

मात्र सभापतींनी राजीनामा नामंजूर करून गटविकास अधिकारी यांची माफी मागायला लावली. यानंतर बीडीओंनी सदस्यांना हाताशी धरून चौकशी सुरू केली. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नेमण्यात आले. या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली. नंतर आपणास अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. यानंतर सुनावणीसाठी बोलावले असता शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामाबाबत ५ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. त्यावेळी आपण पदावर नव्हतो, असे वाघ यांचे म्हणणे आहे.