शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तापीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: August 25, 2015 22:25 IST

उपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

रमाकांत पाटील नंदुरबारउपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या दुष्काळाचे सावट असताना प्रकल्पात पाणी अडविले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, प्रशासन व शेतक:यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तापी नदीवर जिल्ह्यात सारंगखेडा आणि प्रकाशा येथे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. यापूर्वी याठिकाणी उपसा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु या योजना पूर्ण होताच तापी नदी हंगामी वाहू लागल्याने उपसा योजनेचा फायदा शेतक:यांना झाला नाही. उलट माथी कर्ज झाले. या पाश्र्वभूमीवर प्रकल्पांना मंजुरी मिळून रडतखडत या प्रकल्पांची कामे चार वर्षापासून पूर्णत्वास आली आहेत. प्रकल्प पूर्ण झाल;े पण उपसा योजना बंद पडल्या. त्यामुळे जवळपास 400 कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश तूर्त तरी साध्य झालेला नाही. अशा स्थितीत या प्रकल्पांमध्ये अडविलेले पाणी शेतकरी आपापल्या खर्चाने आपल्या शेतार्पयत नेऊन उत्पन्न वाढविण्याची धडपड करीत आहेत. यंदा महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतात जेमतेम जगलेली पिके करपू  लागली आहेत. अशा स्थितीत शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी प्रय} करीत आहे. परंतु तापी काठावरील चित्र मात्र भयानक आहे. वास्तविक पाऊस नसल्याने व दुष्काळाची चर्चा सुरू झाल्याने  प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी प्रय} होणे अपेक्षित होते. परंतु पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे तापीतील पाणी गुजरातमध्ये वाहून जात आहे. सद्य:स्थितीत सारंगखेडा ते प्रकाशादरम्यान तापी नदीचे पात्र कोरडे होऊ लागले आहे. प्रकाशा प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रय} न झाल्याने पाणी गुजरातमध्ये वाहून गेले. परिणामी पात्र कोरडे झाल्याने यादरम्यान असलेल्या शेतक:यांना पिकांना पाणी देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी पाणी अडविण्यासाठी प्रकाशा प्रकल्पाधिका:यांकडे तगादा लावत आहेत. दुसरीकडे या प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी जरी प्रय} झाला तरी आता वरून पाणी सोडण्यासाठीही प्रयत्न करावा लागणार आहे. सारंगखेडा, सुलवाडे आणि हतनूर धरणातून पाणी सोडल्यास प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठा होऊ शकतो. पण सध्या तरी पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे प्रकाशा बॅरेज ठणठणाट आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांविरुद्ध असंतोष व्यक्त होत असून, त्याबाबत गावोगावी बैठकाही होत आहेत. यासंदर्भात काही शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे धाव घेतली असून, संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.