शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अठरा महिन्यांपैकी सात महिने उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:03 IST

दुर्लक्ष : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे धिम्या गतीने काम; वेळेत काम पूर्ण होणे अवघड

जळगाव : जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात १८ पैकी सात महिने उलटले आहेत. सद्यस्थितीला पुलाची पाया भरणीदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकरा महिन्यांत हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न संतप्त जळगावकरांतर्फे उपस्थित केला जात आहे.रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जीर्ण झालेला शिवाजीनगर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वेतर्फे रेल्वेच्या हद्दीतीलच काम करण्यात येणार असून उर्वरित काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेऊन २५ फेब्रुवारीला पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेऊन ८ एप्रिलला पुलावरील सर्व गर्डर काढले होते. गर्डर काढल्यानंतर पुढील कामासाठी रेल्वेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाचे काम सोपविले आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.धीम्या गतीच्या कामामुळे नागरिकांचा संतापरेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजीनगर वासियांनी पर्यायी रस्ता म्हणून तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारण्याची मागणी केली होती. यासाठी तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, डीआरएम, जिल्हाधिकारी यासह मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले होते. तसेच यासाठी शिवाजीनगरवासियांना रेल रोको आंदोलनदेखील करावे लागले होते.महावितरणतर्फे अद्याप निविदाच नाही... शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणतर्फे आचार संहितेनंतर निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र, आचारसंहिता संपून आठवडा उलटल्यानंतरही महावितरणतर्फे अद्याप निविदा काढण्यात आलेली नसल्याने या कामाला पुन्हा विलंब होणार आहे. येत्या दोन दिवसात निविदा निघणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव