शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीपोटी गाळ्यांना ठोकले सील

By admin | Updated: March 16, 2017 00:11 IST

वसुली मोहीम सुरू : पालिकेची धडक कारवाई, व्यावसायिकांमध्ये कारवाईने खळबळ

भुसावळ : थकबाकी वसुलीसाठी पालिकेची धडक वसुली मोहीम सुरू झाली आहे. थकबाकीपोटी पालिकेच्या मालकीची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जामनेर रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज दुकान संकुलातील देवाज युवराज सपकाळे यांचा गाळा नं. 21 आहे. त्यांच्याकडे 48 हजार 96 रुपये थकबाकी आहे. बांगडी मार्केटमधील लक्ष्य स्वयंरोजगार सेवा योजनेचा गाळा नं. 8 यांच्याकडे 46 हजार 992 रुपये थकबाकी आहे. याच संकुलातील गाळा नं.7 चे राजेश  नंदलाल चोपडा यांच्याकडे 16 हजार 142 रुपये थकबाकी आहे. याच मार्केटमधील ताहेर यासीन पटेल यांच्या गाळा नं. 24 कडे 32 हजार 493 रुपये थकबाकी आहे. त्यामुळे हे सर्व गाळे पालिकेने बुधवारी सील  केल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली. यांनी केली कारवाईदरम्यान, पालिकेच्या या मोहिमेमुळे  थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या सूचनेनुसार वसुली पथकप्रमुख सुभाष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गोपाळ पाली, राजू चौधरी, मोहन भारंबे, राजेंद्र टाक,     डी.सी. इंगळे, जयकुमार पिंजारी यांच्या पथकाने थकबाकीपोटी गाळे सील करण्याची कारवाई केली आहे.(प्रतिनिधी)शहरातील विकासकामांसाठी नागरिकांनी त्यांच्याकडील विविध करांची थकबाकी वेळेत भरून पालिका प्रशासनाला सहकार्य   करावे.- बी.टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ नगरपालिका.अतिक्रमणधारकांची बाजू पालिका समजून घेणार साकेगाव शिवारातील पालिकेच्या अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेल्या घरकुलांमध्ये अतिक्रमण केलेल्या रहिवाशांची बाजू व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालिकेतर्फे 17 रोजी दुपारी 4 वाजता पालिका सभागृहात बैठक बोलावली आहे. यात नगराध्यक्ष रमण इंगळे, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर हजर राहतील.225  घरकुले4साकेगाव पालिकेच्या सव्र्हे क्रमांक 297 वर 225 सदनिका असलेले घरकूल उभारण्यात आले आहेत. त्यातील सर्वच घरांमध्ये अतिक्रमण झाले आहे.