शाळा अचानक बंद!

By Admin | Updated: July 15, 2014 12:23 IST2014-07-15T12:23:07+5:302014-07-15T12:23:07+5:30

शासनाच्या मान्यतेविनाच शहरातील गणेशपुरी भागात सुरू करण्यात आलेली खुशबू इंग्लिश मीडियम स्कूल संस्थाचालकांनी अचानक बंद केल्याने पालक संतप्त झाले.

School closed suddenly! | शाळा अचानक बंद!

शाळा अचानक बंद!

 

जळगाव : शासनाच्या मान्यतेविनाच शहरातील गणेशपुरी भागात सुरू करण्यात आलेली खुशबू इंग्लिश मीडियम स्कूल संस्थाचालकांनी अचानक बंद केल्याने पालक संतप्त झाले. 
त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनपा शिक्षण मंडळात धाव घेतली. तब्बल चार तास प्रतीक्षा केल्यानंतरही प्रशासन अधिकारी कार्यालयात न पोहचल्याने संतप्त पालकांनी संस्थाध्यक्षांच्या अक्सानगरातील निवासस्थानी दगडफेक करून निषेध व्यक्त केला. यात संस्थाचालकाने पालकांची दिशाभूल केल्याचे समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी घेतला आहे.
या विद्यार्थ्यांना सिद्धिविनायक शाळेत प्रवेश देण्याची सूचना शिक्षणाधिकार्‍यांनी केली आहे.

Web Title: School closed suddenly!