डोळ्यासमोर चोरटय़ांनी लांबविले सव्वा लाखांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 16:22 IST2017-06-12T16:22:37+5:302017-06-12T16:22:37+5:30

तांबापूरातील घटना. चोरटय़ांचा पाठलाग केल्यानंतरही झाले पसार

Savvy lakhs of jewelery worth croaking in front of the eyes | डोळ्यासमोर चोरटय़ांनी लांबविले सव्वा लाखांचे दागिने

डोळ्यासमोर चोरटय़ांनी लांबविले सव्वा लाखांचे दागिने

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.12 - घरात चोरी करीत असताना घर मालक आल्याचे पाहून दोन चोरटय़ांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे अडीच वाजता तांबापुरात घडली. घर मालकाने त्यांचा पाठलाग केला, मात्र त्यात चोरटय़ांना निसटण्यात यश आले. 
भाजीपाला विक्रेते शेख शाकीर शेख सौकत (वय 40) हे तांबापुरा भागातील अजमेरी गल्लीतील एका किरणाजवळ कुटुंबासह राहतात. घरात गरम होत असल्याने शाकीर हे रविवारी रात्री घराला कुलुप लावून 1 वाजेच्या सुमारास शेजारीच राहत असलेले सासरे शेख मुनीर शेख अहमद यांच्या घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. घराला कुलुप पाहून दोन चोरटय़ांनी कूलूप तोडून कपाटातील 2 तोळे सोने, 900 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने यासह 30 हजार रुपयांची रोकडे लांबविली.

Web Title: Savvy lakhs of jewelery worth croaking in front of the eyes