शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

नाट्यगृह मनपाने चालविल्यास देखभाल खर्चात बचत शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:58 PM

सर्वच ठिकाणचे नाट्यगृह मनपा चालवितात

ठळक मुद्दे विजबिलाचा खर्च वाचविल्यास भाडे होईल कमी शहरात सरासरी १०८ कार्यक्रम

जळगाव: शहरात शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेले छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिर मनपाने चालविण्यास घेतल्यास या नाट्यगृहाच्या देखभाल, दुरुस्तीच्या खर्चात बचत शक्य होईल. तसेच सोलर पॅनल बसवून विजेचा खर्चही वजा होऊन नाट्यगृहाचे भाडे आवाक्यात आणणे शक्य असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.शहरात सुमारे ३५ कोटी रूपयांचा निधी खर्चून भव्य बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात आले आहे. मात्र त्याचे भाडे प्रेक्षक असलेल्या कार्यक्रमांना कमीत कमी १० हजार तर जास्तीत जास्त ७५ हजार इतके आकारण्यात येत आहे. त्यामुळे दर्जेदार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग या ठिकाणी करणे देखील आयोजकांना परवडणारे नाही. तर स्थानिक हौशी कलावंतांना २५-३० हजार रूपये भाडे प्रयोगासाठी देणे अवघड आहे. त्यामुळे या दराचा प्रश्न गंभीर बनला असून तो न सोडविल्यास हे नाट्यगृह केवळ शोभेसाठी उरेल.सर्वच ठिकाणचे मनपा चालवितात नाट्यगृहनंदुरबार, नागपूर यासह नाशिक येथील कालिदास नाट्यमंदिर, पुणे येथील बालगंधर्व नाट्यमंदिर, सिडको नाट्यगृह औरंगाबाद, संत एकनाथ रंगमंदीर औरंगाबाद, तापडिया नाट्यमंदिर औरंगाबाद ही नाट्यगृहे देखील मनपाच चालवितात. त्यामुळे जळगावातील नाट्यगृह देखील मनपाने चालविण्यासाठी ताब्यात घेतले तरच खर्चात बचत शक्य होऊ शकेल.-----------भाडे आकारणी किचकटशासन निर्णयानुसार भाडे आकारणीसाठी वेगवेगळे निकष आहेत. त्यानुसार जळगावात भाडे आकारणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र इतर जिल्ह्यातील भाडे तुलनेने कमी कसे? असा सवाल उपस्थित होत अहे. त्यात आसन क्षमता, वातानुकुलीत आहे एअरकुल्ड, कार्यक्रमांची दिवसाच्या चार सत्रातील वेळ, आणि सुटीचा दिवस या निकषांवर भाडे आकारणी करण्यात आली आहे.१) दिवसाचे चार सत्र असून सकाळ सत्र ७.३० ते ११.३०, प्रथम सत्र दुपारी १२ ते ४, द्वितीय सत्र- दुपारी ४.३० ते रात्री ८.३०, तृतीय सत्र-रात्री ९ ते १. असे आहे. सकाळी कार्यक्रम असेल तर भाड्याचा दर कमी तर रात्री कार्यक्रम असेल तर दर जास्त असेल. तसेच शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी जादा दर आहे.२) नाट्यगृहात ५ प्रभाग करण्यात आले असून त्यात प्रत्येक प्रभागानुसार वेगवेगळे भाड्याचे दर आहेत. १)तालीमसाठी वेगळे दर २)बालनाट्य व स्थानिक हौशी नाटकांसाठी वेगळे दर, ३)सभा-संमेलन, लावणी, तमाशा, आॅर्केस्ट्रा व इतर यासाठी वेगळे दर. ४)शास्त्रीय गायन, ५)व्यावसायिक नाटकासाठी वेगळे दर आहेत.३)तालीम स्टेजवर असल्यास लाईटींगसह- ७५०० रूपये भाडे आहे. तर तालीम प्रॅक्टीस हॉलसाठी १०० रूपये भाडे. सोबत मर्यादित क्षमतेने प्रेक्षक असल्यास ५०० रूपये भाडे आहे.४) जळगावच्या नाट्यगृहाच्या भाडे आकारणीतच साऊंड सिस्टीमचा खर्च समाविष्ट आहे. नाट्यगृहातच साऊंडसिस्टीम बसविण्यात आली आहे.-----------शहरात सरासरी १०८ कार्यक्रमएका सर्वेक्षणानुसार शहरात वर्षभरात सरासरी १०८ कार्यक्रम होतात. तर अंमलबजावणीसाठी ६६ कर्मचारी लागतात. त्यांचा खर्च कसा निघेल ? हा मोठा प्रश्न आहे. सध्या हे नाट्यगृह शासन अथवा मनपाकडे वर्ग झालेले नाही. सार्वनिक बांधकाम विभागच देखभाल करीत आहे. त्यांच्याकडे त्यासाठीचे आवश्यक मनुष्यबळ नाही. मनुष्यबळाअभावी खर्चात वाढ होत असते. सुरक्षा रक्षक, गेटकिपर, इलेक्ट्रीशियन, साऊंड इंजिनियर, लाईट इंजिनियर, लिफ्टमन, हाऊसकिपींग स्टाफ, मॅनेजर, विंडो क्लार्क, गेटकिपर हे सर्व मनुष्यबळ मनपाकडे सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मनपाने जर हे नाट्यगृह ताब्यात घेतले तर देखभालीचा खर्च कमी होईल. त्यामुळे तिकिटांचे दर कमी करणेही शक्य होईल.मनपाला हवा प्रस्तावमनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सुरूवातीला मनपा हे नाट्यगृह चालवायला घेईल, असे सांगितले होते. शहरातील सांस्कृतिक चळवळ जपण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र प्रस्ताव आला तर विचार करू असे आयुक्तांचे म्हणणे आहे.