शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेला स्थगितीसाठी संतोष चौधरींचा अर्ज

By admin | Updated: September 24, 2014 12:07 IST

जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ६0 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार संतोष चौधरी यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.

जळगाव : भुसावळ येथील जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ६0 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार संतोष चौधरी यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे संतोष चौधरी यांनी या अर्जात नमूद केले आहे.
बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात ६0 लाखांच्या खंडणीची फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चौधरी हे कारागृहात होते. या प्रकरणात न्यायालयाने चौधरी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला चौधरी यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.
मंगळवारी अँड.सागर चित्रे यांनी संतोष चौधरी यांच्यातर्फे युक्तीवाद केला. आपल्याला आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी विनंती त्यांनी केली.  यावेळी त्यांनी विविध न्यायालयातील दाखले सादर केले. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतला. चौधरी यांच्या अर्जावर आता २५ रोजी कामकाज होणार आहे, अशी माहिती मिळाली.न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागून आहे.
 
कलम ३८९ अन्वये दिला अर्ज
 
सध्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी संतोष चौधरी हे इच्छुक आहेत. एखाद्या प्रकरणात शिक्षा झाली असल्यास त्यात 'स्टे ऑन कनव्हीक्शन' चा आदेश आवश्यक असतो. त्यामुळे सोमवारी चौधरी यांनी फौजदारी दंड संहिता कलम ३८९ प्रमाणे खालच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अँड.सागर चित्रे यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला.