संतोष चौधरी शिवसेनेत!

By Admin | Updated: February 3, 2015 17:17 IST2015-02-03T17:17:57+5:302015-02-03T17:17:57+5:30

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे भुसावळात राजकीय भूकंप झाला आहे.

Santosh Chaudhary Shivsenaet! | संतोष चौधरी शिवसेनेत!

संतोष चौधरी शिवसेनेत!

भुसावळ : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे भुसावळात राजकीय भूकंप झाला आहे. चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. ते जेव्हा कायद्याच्या कचाट्यात अडकले होते त्या वेळी त्यांना पक्ष व पक्षश्रेष्ठींकडून कोणतीही मदत झाली नव्हती. तुरुंगातून सुटका झाली त्याचवेळी ते पक्षत्याग करतील, असे मानले जात होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चौधरी यांची पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली आहे. दोन-तीन दिवसात प्रवेशाचा सोहळा होण्याची शक्यता आहे. चौधरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भुसावळ पालिकेवर त्यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे. यातच सर्व काही आले. लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल.


- संतोष चौधरी चौधरी यांची राजकीय सुरुवात शिवसेनेपासून झाली. सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती.

Web Title: Santosh Chaudhary Shivsenaet!