शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘हतनूर’चे सर्व दरवाजे उघडल्याने ‘तापी’चा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहराजवळील तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : शहराजवळील तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी दुभडी भरून वाहत असून, हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने रात्री १०ला हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण फुल्ल भरले असल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

३८ हजार हेक्‍टरला लाभ

धरणाची जलपातळी २०९.२१० मीटरपर्यंत पोहोचलेली असून, १७३.३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४४. ६६ टक्के इतका जलसाठा आहे. या पाण्याचा भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर या पाच तालुक्‍यांतील ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीला लाभ मिळणार आहे.