शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रेकॉर्डिंगच्या आधारे इतिवृत्ताची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:26 IST

जळगाव : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून स्थगित असलेली मनपाची महासभा बुधवारी होत असून, मनपाच्या इतिहासात पहिल्यादाचं आॅनलाईन पद्धतीने महासभा ही ...

जळगाव : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून स्थगित असलेली मनपाची महासभा बुधवारी होत असून, मनपाच्या इतिहासात पहिल्यादाचं आॅनलाईन पद्धतीने महासभा ही होत आहे. या सभेसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सभागहात प्रोजेक्टर ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील गोराणे यांनी दिली.महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता या सभेला सुरूवात होणार आहे. सभागृहात महापौर भारती सोनवणे यांच्यासह उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी व नगरसचिव सुनील गोराणे बसणार आहेत. तर स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन , भाजपचे गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान, कैलास सोनवणे आदी पदाधिकाºयांची सतराव्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात केली जाणार आहे. दरम्यान, या सभेच्या अनुषंगाने मनपा प्रशासनातर्फे प्रभाग समिती निहाय डेमो तयार करण्यात आले असून, यामुळे नगरसेवकांना घरी बसूनही सभेत सहभागी होता येणार आहे.आॅनलाईन सभेत सहभागी कसे व्हावे, अ‍ॅपचा उपयोग कसा करावा, याबाबत नगरसेवकांना माहिती पुस्तिकादेखील देण्यात आली आहे. आपला मुद्दा मांडायचा असेल तर त्यांना हँड राईज आॅप्शनने हात उंचवावा लागणार आहे. नगरसेवकांनी हात उंचावल्यावर संबंधित नगरसेवक महापौरांना स्पष्ट दिसण्यासाठी सभागृहात प्रोजेक्टर ठेवण्यात येणार आहे. यामुळे महापौरांना संबंधित नगरसेवकाला बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, आॅनलाईन सभेसाठी सर्व तयारी करण्यात आली असून, गेल्या रविवारीदेखील या सभेची पूर्व चाचणी घेण्यात आली. त्यामुळे कुठल्याही अडथळ््या विणा ही सभा पार पडणार असल्याचे गोराणी यांनी सांगितले.पहिल्यादाचं होणाºया आॅनलाईन सभेचे संपूर्ण रेकॉडिंग केले जाणार आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे सभेच्या इतीवृत्ताची नोंद केली जाणार आहे. दरम्यान, काही सदस्यांकडून नेटवर्कच्या समस्यामुळे सभेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव