बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गासाठी प्रस्ताव

By Admin | Updated: February 12, 2015 13:31 IST2015-02-12T13:31:41+5:302015-02-12T13:31:41+5:30

बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बुधवारी दिली.

Proposal for the Barhanpur-Ankleshwar highway | बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गासाठी प्रस्ताव

बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गासाठी प्रस्ताव

जळगाव : बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बुधवारी दिली. 
खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात वार्तालाप केला. त्या म्हणाल्या, बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर मार्ग हा महत्त्वाचा आहे. जिल्हावासीयांसाठी तो उपयोगाचा व महत्त्वाचा आहे. त्याची अनेक भागात खराब अवस्था आहे. 
ही बाब लक्षात घेता त्याच्या दुरुस्तीसंबंधी केंद्राकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार रावेर ते यावल या दरम्यानच्या कामासाठी केंद्राने २५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. रावेर ते यावल या दरम्यानचे अंतर २७.५ कि.मी. एवढे आहे. टप्प्याटप्प्याने या मार्गाचे नूतनीकरण होईल, असेही त्या म्हणाल्या. तसेच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला तर त्याचा विकास आणखी गतीने करता येईल, असेही त्या म्हणाल्या. 
भुसावळ-जामनेर मार्गासाठीही निधी
भुसावळ ते जामनेर या रस्त्यासाठीही निधी मंजूर झाला आहे. 
पाच कोटी रुपये या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर झाले असून, पाच कि.मी. रस्ता त्याद्वारे केला जाईल, असेही खासदार खडसे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Proposal for the Barhanpur-Ankleshwar highway