केऱ्हाळे येथे आज विठ्ठल मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST2021-06-30T04:11:33+5:302021-06-30T04:11:33+5:30

केऱ्हाळे, ता. रावेर : येथे ग्रामस्थांच्या मदतीने नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात ३० जूनला विठ्ठल-रुखमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ...

The prestige of idols in the temple of Vitthal at Kerala today | केऱ्हाळे येथे आज विठ्ठल मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

केऱ्हाळे येथे आज विठ्ठल मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

केऱ्हाळे, ता. रावेर : येथे ग्रामस्थांच्या मदतीने नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात ३० जूनला विठ्ठल-रुखमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सात सपत्नीक जोडप्यांच्या हातून पूजाविधी करण्यात येणार आहे. पुरोहित म्हणून हरी दुबे, गणेश दुबे व शारंगधार महाराज मेहुण यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी सहभागी होणार आहेत.

या मंदिरस्थळी विठ्ठल-रुखमाई यांच्यासोबत श्री गणेशाची मूर्ती, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत गोविंद महाराज, संत रघुनाथ महाराज व गोरा कुंभार यांच्या मूर्तीसुद्धा विराजमान होणार आहेत.

याठिकाणी प्राणप्रतिष्ठा करते वेळी कोरोनाच्या नियमांच्या अधीन राहून हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी दर्शनार्थ येताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The prestige of idols in the temple of Vitthal at Kerala today