शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१00 गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा

By admin | Updated: January 30, 2015 14:57 IST

आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिले.

 

जळगाव : आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला दिले. जिल्हा नियोजन भवनात महाराष्ट्र राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाभरात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, पुरवठा अधिकारी विकास गजरे, राष्ट्रीय छात्रसेनेचे कर्नल के.व्ही.विठ्ठल, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, ५ बटालियन राष्ट्रीय आपत्ती दलाचे कुमार राजीवरंजन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नरविरसिंग रावळ उपस्थित होते. राजीवरंजन यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची माहिती देऊन या दलाचे देशातील विविध नैसर्गिक आपत्ती व त्यांच्या मदत कार्यात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार नरवीरसिंग रावळ यांनी मानले. जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, मनपा, नगर पालिका, तहसील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील २३ विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सात कार्यशाळा शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचा शाळा सुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. आपत्ती निवारणार्थ १६ पथके गठीत जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती निवारणात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. जिल्ह्यातील सर्वच कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा तयार करावा व सर्व कर्मचार्‍यांना आपत्तीच्या प्रसंगी काय करावे? यासाठी प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षणाला कर्मचार्‍यांनी प्रतिसाद द्यावा. स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांना त्यात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची १६ पथके जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.