बालाजी शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:11+5:302021-08-27T04:20:11+5:30

पारोळा : श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाच्या संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यू.एच. करोडपती ...

Praise of the students in Balaji School | बालाजी शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

बालाजी शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पारोळा : श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाच्या संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यू.एच. करोडपती होते.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालक मंगला करोडपती, मोहन बडगुजर, सुनील बडगुजर, सदस्य भानुदास बडगुजर, संजय बडगुजर, डॉ. चेतन बडगुजर, संकेत बडगुजर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, नगरसेवक नितीन सोनार, उपप्राचार्य जे.बी. पाटील, बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, डॉ. व्ही.एम. जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर आदी उपस्थित होते.

या वेळी बालाजी संकुल व करोडपती परिवाराच्या वतीने पारोळा कुटीर रुग्णालयाला ३५ हजार रुपये किमतीचे तीन पॅरा माॅनिटर लोकार्पण करण्यात आले.

बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन वैशाली साळुंखे, वैशाली सावंत, देवीदास जाधव, वैशाली पाटील, शिवाजी पाटील यांनी केले. आभार योगेश वाघ यांनी मानले.

Web Title: Praise of the students in Balaji School