विजेचा तार पडल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST2021-09-27T04:18:09+5:302021-09-27T04:18:09+5:30

रावेर जि. जळगाव : विजेच्या खांबावरील तार तुटून पाच शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी कोचुर खुर्द ...

The power line fell | विजेचा तार पडल्याने

विजेचा तार पडल्याने

रावेर जि. जळगाव : विजेच्या खांबावरील तार तुटून पाच शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी कोचुर खुर्द गावात घडली.

सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असताना ही घटना घडली. आंबेडकर नगरातील गौतम तायडे यांच्या मालकीच्या ३० हजार किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची ७ हजार किमतीची १ तर संतोष तायडे यांच्या मालकीची ७ हजार किमतीची एक अशा अंदाजे ४४ हजार रुपयांच्या शेळ्या ठार झाल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला.

सावदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बकऱ्याचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी सपोनि देवीदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, रिजवान पिंजारी, विनोद पाटील, देवेंद्र पाटील, वीज वितरण कर्मचारी यांनी भेट दिली.

Web Title: The power line fell