शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीचे मैदान गाजविणारा खेळाडू जीवनाच्या परीक्षेत हरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

फोटो : ७.१२ वाजेचा मेल. लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आई-वडील कामाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास ...

फोटो : ७.१२ वाजेचा मेल.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आई-वडील कामाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गोपाळपुरा भागात उघडकीस आली. कबड्डीचे मैदान गाजविणारा नितीन प्रदीप सोनवणे (२३,रा.गोपाळपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे.

गोपाळपुरा भागातील पाण्‍याच्या टाकीजवळ नितीन हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. वडील कुरिअरच्या दुकानात कामाला आहेत. तर नितीन हा भांड्याच्या दुकानात काम करीत होता. शुक्रवारी सकाळी आई-वडील कामाला निघून गेल्यामुळे नितीन हा घरात एकटा होता. दुपारी त्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

वडील घरी आल्यावर उघडकीस आली घटना

दुपारी २ वाजेच्या सुमारास वडील घरी परतले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच, त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. समोरचे दृष्य पाहिल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. तरूणाने गळफास घेतल्याची माहिती मिळताच, काही वेळातंच शनिपेठ पोलीस ठाण्‍यातील मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व रवींद्र पाटील यांनी घटनास्थळ गाठले. नंतर पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्‍यात आला. याप्रकरणी सीएमओ डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे.

नितीन उत्कृष्ट कबड्डी खेळाडू

जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविल्यानंतर नातेवाईकांसह मित्रांची त्याठिकाणी एकच गर्दी झाली होती. मयत नितीन हा उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होता. विभाग व जिल्हास्तरावर तो कबड्डी खेळला असून त्याने टोकाचा निर्णय का घेतला असावा, असा सवालही मित्रांकडून उपस्थित होत होता. तर त्याचे जाण्‍याने मित्रांना देखील धक्का बसला होता. नितीन याच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहिण असा परिवार आहे. तसेच त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजून आलेले नाही.