शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात प्लॅस्टिक बंदी कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:19 IST

पथकाने बदलला पंचनामा : ५ हजारांचा दंड आला पाचशेवर!

चोपडा : शहरात नगरपालिका पथकाने कारवाई करीत दुकानदाराकडून प्लॅस्टिक जप्त केले. तसेच दंडही वसूल केला. मात्र, ५ हजार रुपयांचा पंचनामा बदलून संबंधित दुकानदाराकडून केवळ ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावरून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.२१ सप्टेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी पाऊच विक्रेता सचिन हुकूमचंद जैन या दुकानदाराकडून पालिकेच्या पथकाने ५०० पाणी पाऊच पकडल्या. याचा कायदेशीर पंचनामा शहरातील दोन जबाबदार नागरिकांसमोर करण्यात आला होता. मात्र सदरील ५ हजार रुपये दंडाचा पंचनामा बदलवून निव्वळ ५०० रुपये दंडाचा पंचनामा दाखविण्यात आला. त्यामुळे या पथकातील सदस्य हितसंबंध जोपासत असून दंडाची रक्कम कमी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. शेकडो नागरिकांसमोर ५ हजार दंडाचा पंचनामा केल्याची माहिती शहर समन्वयक शुभम पाटील, किशोर पवार यांनी उपस्थित पत्रकारांना दिली होती. मग दंडाची पावती ५०० रुपये कशी झाली? यावरुन शहरभर संशय व्यक्त केला जात आहे.नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ आरोग्यासाठी हानिकारक प्लॅस्टिक पिशव्या विकत असल्याची माहिती प्रशासनास मिळाली होती. त्यावरून मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील, शहर समन्वयक शुभम पाटील, किशोर पवार, विजय शिरसाठ यांनी ही कारवाई केली. या कारवाईची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

पालिकेचा दुजाभावगेल्या आठवड्यात १३ रोजी पथकाने शहरातील अनेक दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजार दंडाची तर काहींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती. मग सदर विक्रेत्यावर फक्त ५०० रुपये दंडाचीच कारवाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.