शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: May 2, 2017 11:55 IST

51154-भुसावळहून मुंबईला (सीएसटी) जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली.

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.2- 51154-भुसावळहून मुंबईला (सीएसटी) जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली. तांत्रिक कारणामुळे ही गाडी आज मुंबई जाऊ शकणार नसल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. याबाबत सकाळी प्रशासनातर्फे प्रवाशांची गैरसोय व धावपळ होऊ नये म्हणून उद्घोषणा करण्यात आली.
दरम्यान, ही गाडी रद्द झाल्याने या गाडीने प्रवास करणा:या हजारो प्रवाशांचे प्रवासांचे नियोजन गडबडले. प्रवाशांची चांगलीच पळापळ झाली. या गाडीने नियमित, जळगाव, पाचोरा, चाळीसगावर्पयत प्रवास करणा:या चाकरमाण्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, भुसावळ येथून, जळगाव व पाचोरा येथे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी आयटीआयसाठी जात असतात त्यांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला.  
दरम्यान, सकाळी 6.30 वाजता भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याबाबत उद्घोषणा केली जात होती. शिवाय प्रवाशांना त्रास झाल्याबद्दल रेल्वेतर्फे खेद व्यक्त केला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
50 स्थानकांवर थांबणारी गाडी
भुसावळ येथून निघणारी ही पॅसेंजर गाडी मुंबई र्पयत सुमारे 50 स्थानकावर थांबत असून या गाडीने भुसावळ येथून रोज 500-600 प्रवासी येथून बसतात. या गाडीला साधारण श्रेणीतील 17 डबे  जोडलेले असतात, असे सूत्रांनी सांगितले. या गाडीने प्रवास करणारे प्रवासी महानगरी व अन्य हॉलीडे स्पेशलने रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गाडी रद्दचे असे आहे तांत्रिक कारण
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मालगाडीला 1 रोजी मोठा अपघात झाला होता. या मार्गावर भुसावळ येथे येणारी 51153 मुंबई भुसावळ या गाडीचे डबे जोडून त्या मार्गावर गाडी चालविण्यात आली. 1 रोजी मुंबईहून गाडी न आल्याने  2 रोजी मुंबईला जाणारी गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
भुसावळ-पॅसेंजर 2 रोजी रद्द करण्यात आल्याबाबतचा संदेश मुंबई मुख्यालयातून 1 रोजी प्राप्त  होताच त्याबाबत स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करुन नोटीस बोर्डावर माहिती दिली. शिवाय नियमित उद्घोषणाही केली जात होती. प्रवाशांची गैरसोय झाली नाही.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक,
 डीआरएम कार्यालय, भुसावळ.