ऑनलाईन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}धुळे,दि.13 : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पारोळा पोलिसांनी भूषण पाटील व भिकन पाटील (रा़ पारोळा) या दोन सोनपोत चोरटय़ांना सापळा रचून पकडले होत़े त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुपारी न्यायालयात हजर केल़े न्यायालयाने दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आह़े दोघांनी शहरासह देवपूर, जळगाव, अमळनेर येथून सोनसाखळी लंपास केल्याचे उघडकीस आले आह़े
साक्री रोडवरील गुरूनानक सोसायटीत राहणा:या नेहा हरेश कुंडल यांची 4 जून रोजी सकाळी दुचाकीवरील चोरटय़ांनी पोत लांबविण्याचा प्रयत्न केला होता़ ते सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाले होते. त्यानंतर ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल़े घटनेनंतर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरटय़ांचा शोध सुरू केला होता.