शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडले - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 06:38 IST

जळगाव येथील ‘मुक्ताई’ बंगल्यावर खडसे यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर तसेच राज्यातील घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेतले. 

जळगाव: पक्षांतर्गत कुरघोड्या करतानाच पक्षाच्या उमेदवारांविरूद्ध कारवाया करून उमेदवारांना पाडण्याचे उद्योग झाले. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनाही अशाच रितीने पाडण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचाही असाच आरोप आहे. हे उद्योग करणाऱ्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पुराव्यासह देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जळगाव येथील ‘मुक्ताई’ बंगल्यावर खडसे यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर तसेच राज्यातील घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेतले. खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नसून पक्षांतर्गतच कटकारस्थान करुन त्यांना पाडण्यात आले. त्यांच्या विरोधातील उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत पुरविली गेली, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्याबाबत तर उघडपणे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्यांची नावे मला स्वत:लाच माहिती आहेत. ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळविली. मात्र अजूनही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. कारवाईची वाट पाहत आहोत.

‘त्या’ अस्वस्थ असल्या तरी काय निर्णय घेणार? याची माहिती नाही. त्यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केलेली नाही. तसेच गोपीनाथराव मुंडे असल्यापासून भगवान गडावर नियमितपणे जात होतो. आताही पंकजा यांनी बोलविले तर गोपीनाथ गडावर जाणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी अल्पकाळातील मुख्यमंत्रिपदाच्या काळात केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी परत पाठविल्याच्या आरोपात तथ्य वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.पक्षांतराची शक्यता फेटाळलीशिवसेना प्रवेशाबाबत तुमचीही चर्चा होती? अशी विचारणा केली असता, ५ वर्षांत २५ वेळा चर्चा झाली, जाईल तर तुम्हाला सांगून जाईल, अशा शब्दांत त्यांनी पक्षांतराची शक्यता फेटाळली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेPankaja Mundeपंकजा मुंडे