जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST2021-03-05T04:17:13+5:302021-03-05T04:17:13+5:30

जळगाव : महिला व बालविकास विभागाच्या निर्णयानुसार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात ...

Organizing an online competition on the occasion of World Women's Day | जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

जळगाव : महिला व बालविकास विभागाच्या निर्णयानुसार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात स्त्री भ्रुण हत्या एक सामाजिक समस्या निबंध स्पर्धा, महिला दिन या विषयावर कविता व लेखन व्हीडीओ किंवा मेल पाठविणे, महिला दिन या विषयावर घोषवाक्य तयार करणे, महिला दिन या विषयावर चित्र काढणे, जागतिक महिला दिन प्रतिज्ञा करून मेलवर व तालुका निहाय पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वरील वैयक्तीक कृती करुन दिलेल्या मेलवर व तालुकानिहाय व्हाटस्ॲप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्ता, मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांकासह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यांनी कळविले आहे.

Web Title: Organizing an online competition on the occasion of World Women's Day