शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
7
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
8
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
9
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
10
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
11
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
12
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
13
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
14
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
15
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
17
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
18
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
19
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
20
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेने ‘पिले’ यांची नियुक्तीचं केली नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदासाठी रमेश श्रावगी यांचा प्रस्ताव पाठविला असतानासुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदासाठी रमेश श्रावगी यांचा प्रस्ताव पाठविला असतानासुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेच्या कामात ढवळाढवळ करीत त्यांच्या मर्जीतील व्यक्ती उपशिक्षक संजय पिले यांच्याकडे प्रभारी मुख्‍याध्‍यापकाचा पदभार सोपविला असल्याचा आरोप करीत संस्थेने अशी कुठलीही नियुक्ती केलेली नसल्याची तक्रार ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्‍यक्ष अरविंद लाठी यांनी उपसंचालकांकडे केली आहे.

आर.आर. विद्यालयात संजय पिले हे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांची प्रभारी मुख्‍याध्‍यापक म्हणून ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीकडून नियुक्ती केली नसून तसा ठरावसुद्धा करण्‍यात आलेला नाही. दरम्यान, मुख्‍याध्‍यापक पदासाठी परेश श्रावगी यांचा प्रस्ताव माध्‍यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्‍यात आला असता, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही करण्‍यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याआधीदेखील झंवर यांच्याकडे परस्पर प्रभार देण्‍यात आला होता. सोबतच पिले यांना प्रशासकीय कामात ढवळाढवळ न करण्‍याचेही पत्र पाठविण्‍यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अनधिकृतपणे स्वाक्षरी केल्याचा आरोप

संजय पिले यांच्याकडे कुठलेही अधिकार नसताना त्यांनी प्रशासकीय तसेच आर्थिक कामकाजावर अनधिकृतपणे स्वाक्षऱ्या करून व त्यातून विद्यार्थी पालक व शाळेच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास शिक्षणाधिकारी व पिले हे जबाबदार असतील, असेही अरविंद लाठी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्‍याची मागणी त्यांनी केली आहे.