शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांचा विश्वासघात करणाऱ्यांवर राज्यभर गुन्हे दाखल करण्यासाठी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचा मोठा विश्वासघात झालेला आहे. याला जबाबदार असलेला अवसायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआर या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचा मोठा विश्वासघात झालेला आहे. याला जबाबदार असलेला अवसायक जितेंद्र कंडारे, विवेक ठाकरे व इतरांविरुद्ध राज्यभर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी संघटनांनी मोहीम उघडली असून गुंतवणूकदारांना आवाहन केले जात आहे.

दरम्यान, जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांच्या अटकेसाठीही सरकारवर दबाव आणण्यासाठी आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना साकडे घातले जात आहे. पुण्यातून दामोदर दाभाडे, जळगावातून अशोक मंडोरे व गिरधर डाबी यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विवेक ठाकरे, महावीर जैन, सूरज झंवर यासह काही जणांना अटक झाली आहे. तर प्रमुख घोटाळेबाज अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ठेवीदारांना फसविणारे सध्या जेलची हवा खात आहेत तर ज्यांनी ठेवीदारांकडे जाऊन २५ ते ३० टक्के रक्कम देऊन अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना फसविले आहे अशा सर्वांच्या नावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात, कंडारे याने ठेवीदारांच्या पावत्या २५ ते ३० टक्क्यात घेऊन त्या पावत्या १०० टक्के रकमेत कर्जदारांच्या कर्जात मॅचिंग करून ठेवीदारांना फसविले आहे, अशा प्रकरणात जितेंद्र कंडारेच्या व ज्यांनी पैसे देऊन पावत्या घेऊन गेला त्यांच्या नावाने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा.

कंडारे व विवेक ठाकरेने ठेवीदारांच्या मूळ पावत्या घेऊन पैसेच दिले नाहीत; मात्र विवेक ठाकरेने ठेवीदारांकडून १ हजार रुपये सभासद फी आणि ७ हजार रुपये लढा निधी घेऊन फसविले आहे. त्याशिवाय ठेवीदारांकडून ठेवीच्या एकूण रक्कमच्या ५ टक्के रोख रक्कम घेऊन कोरे बिअरर चेक घेऊन २० टक्के रक्कम परस्पर काढून घेण्यात यावी असे राजीपत्र म्हणजे स्वखुशीने १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून घेतले आहे. म्हणून या दोघांच्या नावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले जात आहे.