शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश शिक्षण मंडळातील भरती रद्द करण्याचे आदेश

By admin | Updated: June 17, 2017 15:40 IST

भरती रद्द करण्याचे आदेश खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याना दिले आहेत.

ऑनलाईन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 17 - खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील 18 प्राध्यापकांच्या बेकायदेशीर भरतीप्रकरणात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून ही भरती रद्द करण्याचे आदेश खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याना दिले आहेत.  अमळनेर येथील लोटन महारु चौधरी यांनी प्रताप महाविद्यालयात झालेल्या 18 प्राध्यापकांची भरती बेकायदेशीर असल्याची तक्रार उप संचालकांकडे केली होती. खान्देश शिक्षण  मंडळावरील बरखास्त कार्यकारिणीने  जानेवारी 2017 मध्ये कोणतीही जाहिरात न देता ही भरती केली होती. शिक्षण उप संचालकांनी शिंदे यांच्या मार्फत मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार करून त्यांना ना हरकत व शिक्षण सेवकांची मान्यता दिली होती आणि याबाबत आमदार चंदूलाल पटेल यांनी जाब विचारला असता शिक्षण उप संचालकांनी कोणतीही मान्यता दिली नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र तक्रारदाराने माहिती घेतली असता गरुड नावाची एक प्राध्यापिका पारोळा महाविद्यालयात असतानाही अमळनेर महाविद्यालयाच्या मस्टरवर मार्चपासून सह्या सुरू झाल्या आणि उर्वरित 18 प्राध्यापकांच्या सह्या वेगळ्या हजेरी पत्रक वर घेतल्या जात आहेत. शिक्षण उपसंचालकांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप चौधरी यांनी लेखी तक्रारीत करून ना हरकत रद्द करावी व मान्यता ही रद्द करीत कठोर कारवाई करावी, अन्यथा पोलिसात जबाबदार सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा  चौधरी यांनी दिला होता. याची उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दाखल घेऊन त्यांच्याच कार्यालयाची नाहरकत रद्द करून बेकायदेशीर भरती रद्द करण्याचे आदेश 16 जून रोजी दिले असून यामुळे अमळनेरसह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे