शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तरसोद फाट्याजवळील विचित्र अपघातात एक ठार

By admin | Updated: June 13, 2014 15:02 IST

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळील गणपती मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर ट्रक, रिक्षा, रुग्णवाहिका आणि कारच्या विचित्र अपघातात दीपक १ ठार तर ३ जखमी झाले.

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळील गणपती मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर ट्रक, रिक्षा, रुग्णवाहिका आणि कारच्या विचित्र अपघातात दीपक अरुण पाटील(२२)रा.नशिराबाद हा युवक ठार झाला तर तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे बांभोरीपर्यंत दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हा अपघात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला. भुसावळकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने (ओ.आर.१५जे २८५८) जळगावकडे येत असलेल्या रिक्षाला (एम.एच.१९ व्ही १९२४) समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचा चुराडा झाला आणि उजव्या बाजूला असलेल्या जागृत हनुमान मंदिरासमोरील नाल्यात पडली. त्यानंतर ट्रक व रिक्षासमोर असलेल्या नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला(एम.एच.१९एम.९१४१)धडक देऊन त्याच नाल्यात पलटी झाला. ट्रकने धडक दिल्याने रुग्णवाहिकेची समोरच्या चारचाकीला (एम.एच.२0,सी.पी.७२९९) धडक बसली. या विचित्र अपघातात रिक्षातील दीपक अरुण पाटील (२४),रा.नशिराबाद, शहाजी माणिक जाधव (२२),रा.बुरसाळे,जि.सोलापूर, प्रमोद ज्ञानदेव गदरे (२२),रा.पुणे आणि दिनेश नीळकंठ जंगले(५0)रा.भुसावळ हे जखमी झाले. ते जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीशहाजी जाधव व प्रमोद गदरे यांना ओम क्रिटीकल केअरमध्ये दाखल करण्यात आले. दोन्ही डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ अँग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत. दीपक अरुण पाटील याला 'सिव्हील'मधून खाजगी हॉस्पिटल व नंतर पुन्हा 'सिव्हील'मध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याचा सायंकाळी ६ ला जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तो ली ग्रॅंड कंपनीत काम करीत होता. शहाजीच्या छातीला व हातापायांना मार बसलेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे