शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता रुग्णांच्या संख्येनुसार मिळणार रुग्णालयांना ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गासोबतच रुग्णदेखील वाढत असल्याने कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गासोबतच रुग्णदेखील वाढत असल्याने कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे पाहूनच रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा विचार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. ऑक्सिजनच्या योग्य वापरासाठी रात्रीच्यावेळी रुग्णाला लावण्यात आलेल्या ऑक्सिजनची दर दोन तासांनी तपासणी करणे आवश्यक आहे, याविषयी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, यासोबतच ऑक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग पसरला. मात्र त्या तुलनेत यंदा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यांना ऑक्सिजनची गरज अधिक भासत आहे. यामुळेच जिल्ह्यात दररोज साधारण ४० ते ५० टन ऑक्सिजन लागत असून, त्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची आणीबाणीची परिस्थिती उद्भवते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहिती दिली.

ऑक्‍सिजनच्या वापरासंदर्भात यापूर्वीदेखील रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील जिल्ह्यात ऑक्‍सिजनची जेमतेम उपलब्धता होत आहे. यावर मात करण्यासाठी सरसकट कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन न लावता ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णाला तो लावला गेला पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

प्रत्येक रुग्णालयाकडे असलेल्या सिलिंडरच्या संख्येनुसार त्यांना ते रिफिलिंग करून दिले जाते. मात्र आता कोणत्या रुग्णालयात किती गंभीर रुग्ण दाखल आहे व किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे पाहूनच त्या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

घरी सिलिंडर देणे खपवून घेणार नाही

बहुतांश वेळा घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर दिले जाते. यामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात लागतो व तो वायादेखील जातो. त्यामुळे आता घरी कोणी सिलिंडर दिले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

वेळोवेळी तपासणी आवश्यक

रुग्णाला ऑक्सिजन लावल्यानंतर तो कधी बंद करावा व किती प्रमाणात सुरू ठेवावा, हे पाहणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी ऑक्सिजन लावून दिल्यानंतर त्याकडे पाहिले न गेल्यास ऑक्सिजनचा विनाकारण वापर सुरू राहू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दर दोन-दोन तासांनी ऑक्सिजनची पाहणी करावी, अशा सूचना रुग्णालयांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.